Friday, December 20, 2024

/

हवा प्रदूषणात बेळगाव 546 व्या क्रमांकावर

 belgaum

पीएम2.5 हवा प्रदूषण मोजमापासाठी जगभरातील 117 देश आणि प्रदेशांमधील 6475 शहरातील हवा निरीक्षण केंद्रांचा प्रदूषण मोजमाप अहवाल अर्थात आयक्यूएअर्स 2021 जागतिक हवा गुणवत्ता अहवाल जाहीर झाला असून या 6475 शहरांमध्ये बेळगाव 28.1 इतक्या पर्टिक्युलेट मॅटरसह ( कणद्रव्य) 546 व्या क्रमांकावर आहे.

बेळगावचा पीएम 2.5 सरासरी वार्षिक 28.1 इतका असला तरी तो जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) विहित मर्यादेपेक्षा 6 पटीने अधिक आहे.

आयक्यूएअर्स 2021 जागतिक हवा गुणवत्ता अहवाल हा आघाडीचा प्रमुख वैश्विक हवा गुणवत्ता अहवाल मानला जातो. जो जागतिक आरोग्य संघटनेच्या पीएम 2.5 हवा गुणवत्ता मार्गदर्शक सूचीवर आधारित असतो. डब्ल्यूएचओची नवी मार्गदर्शक सूची गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आली आहे.Air pollution

सूक्ष्मकण प्रदूषणाला ‘पीएम2.5’ म्हंटले जाते. जे सर्वसामान्यपणे व्यापक हवा प्रदूषक आणि पर्यायाने आरोग्यास हानिकारक मानले जाते. ज्यामुळे दमा, हृदय विकाराचा झटका, फुफ्फुसाचे विकार होण्याचा धोका असतो. पीएम2.5 मुळे दरवर्षी लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो.

कर्नाटकमध्ये हवा प्रदूषणाच्या बाबतीत बेळगाव 4 थ्या क्रमांकावर आहे. बेळगावच्या आधी हुबळी, यादगिरी आणि बेंगलोर यांचा क्रमांक लागतो. त्यामागोमाग चिकबळ्ळापूर, विजयपुरा, रामनगर, चिकमंगळूर, मडिकेरी, चामराजनगर, बागलकोट, हावेरी, मंगळूर आणि म्हैसूर यांचा क्रमांक लागतो. या सर्व ठिकाणचे पीएम2.5 चे मूल्य 19.1 इतके कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.