Friday, February 7, 2025

/

बेळगाव मनपाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

 belgaum

जिल्हाधिकारी आणि बेळगाव महापालिकेचे प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी आज बुधवारी महापालिकेच्या 2022 -23 सालच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. हे अंदाज पत्रक 6.31 लाख रुपयांचे अतिरिक्त अंदाज पत्रक (खर्चापेक्षा पावत्या जास्त) दर्शविणारे आहे.

अंदाजे पावत्या -44765.22 लाख रुपये, अंदाजे खर्च -44758.91. पथदीपांच्या देखभालीसाठी 550 लाख रुपये, गटर रस्ते आदींच्या देखभालीसाठी 550 लाख रुपये, पायाभूत सुविधांच्या युद्ध पातळीवरील दुरुस्तीसाठी 500 लाख रुपये, अनुसूचित जाती -जमाती कल्याणासाठी राखून ठेवलेला निधी 509 लाख रुपये,

मागासवर्गीयांच्या विकासासाठीचा निधी 169.37 लाख रुपये, शारीरिक दृष्ट्या विकलांग यांच्या उत्थानासाठीचा निधी 116.81 रुपये, उद्यमबाग परिसरातील पायाभूत विकासासाठी 200 लाख रुपये, रस्त्याशेजारी विक्रेत्यांसाठी व्हेंडिंग झोन बनवण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय शहरी उपजीविका मोहीम (डीएएल -एनयुएलएम) अंतर्गत 500 लाख रुपये, घरगुती कचऱ्याच्या वर्गीकरणासाठीच्या डब्यांसाठी 200 लाख रुपये.City corporationbelgaum

उद्यानांच्या विकासासाठी 100 लाख रुपये, महिलांसाठीच्या पिंक टॉयलेटसाठी 100 लाख रुपये, रस्त्यावर विविध मूर्ती उभारण्यासाठी 100 लाख रुपये, रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी 60 लाख रुपये. जिल्हाधिकारी कार्यालय येथील पायाभूत सुविधा सुधारणेसाठी 50 लाख रुपये, पत्रकारांच्या कल्याणासाठी 30 लाख रुपये, अंत्यविधीसाठी लागणाऱ्या शेणाच्या गोवऱ्याासाठी 50 लाख रुपये,

रोगनियंत्रणासाठी 50 लाख रुपये, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 13.61 लाख रुपये, जिम्नॅशियम बॅडमिंटन हॉल आणि जलतरण तलावांच्या देखभालीसाठी 50 लाख रुपये, प्लास्टिक मुक्त अभियानासाठी 10 लाख रुपये, प्रलंबित मालमत्ता कर, पाण्याचे बिल आदिंसंदर्भात एसएमएस धाडले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.