बेळगाव टीम इंडियाचे माजी स्केटिंग प्रशिक्षक प्रवीण देशपांडे हे बेळगावमधील स्केटिंगपटूंना स्केटिंगचे धडे देण्यासाठी बेळगावला आले आहेत.
बेळगावमध्ये आल्यानंतर रमेश परदेशी, तुकाराम पाटील, बसवराज कोरीशेट्टी आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी प्रशिक्षक मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने, योगेश कुलकर्णी, अजित शिलेदार, आशिष वाघ आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटिंगपटू आणि पालक उपस्थित होते.
बेळगाव मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी केएलई संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटींग रिंकवर जाऊन स्केटिंगपटूंना स्केटिंगचे धडे दिले.
उद्या दिनांक 6 रोजीही ते बेळगावच्या स्केटिंगपटूंना स्केटिंगबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी कसा सराव करावा याबद्दलही धडे देणार आहेत त्यांचे मार्गदर्शन बेळगावच्या स्केटिंगपटूंकरिता खूपच लाभदायक ठरणार आहे.