Monday, April 29, 2024

/

खानापुरातील चोऱ्यांप्रकरणी 3 सराईत चोरटे गजाआड

 belgaum

खानापूर, निपाणी आणि संकेश्वर परिसरातील चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या मूळच्या महाराष्ट्रातील 3 चोरट्यांना खानापूर पोलिसांनी हरिहर येथून ताब्यात घेतले.

खानापूर शहरात नोव्हेंबर महिन्यात एकाच रात्री 6 घरफोड्या झाल्या होत्या. याप्रकरणी तीन चोरट्यांना खानापूर पोलिसांनी हरिहर येथे ताब्यात घेतले. सदर तीनही चोरट्यांना हरिहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून सोमवारी संबंधित चोरट्यांना खानापुर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अनिलनगर सोलापूर येथील सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय 30), जुना कराड नाका पुणे येथील महेश कुमार तनोज (वय 31) आणि तानाजी चौक सोलापूर येथील सारंग उर्फ सागर संजय तोळे (वय 25) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हरिहरमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी या तिघांना हरिहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

 belgaum

चौकशी वेळी त्यांनी खानापूर शहरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यामुळे अधिक चौकशीसाठी खानापूर पोलिसांनी त्यांना रविवारी बॉडी वारंटवर एक दिवसासाठी ताब्यात घेतले. चौकशी संपल्यावर त्यांना खानापूर न्यायालयासमोर हजर करून पुन्हा सायंकाळी हरिहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

खानापूर पोलिसांच्या चौकशीतही या आरोपींनी खानापूर शहरात चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे. दावणगेरे येथील चोऱ्यांबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर, निपाणी परिसरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. या टोळीचा प्रमुख सचिन माने यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने पुण्यातील येरवडा कारागृहात काही काळ तुरुंगवासही भोगला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.