के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील जोश २०२१ कार्यक्रमात उल्लेखनीय यश प्राप्त केले.
मुंबईच्या नेस्ट अकादमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट या संस्थेने जान है तो जहान है या थीमवर आधारित स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेमध्येगोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी वेस्टर्न डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला
तर इंडीयन डान्स आणि फॅशन स्पर्धेत उप विजेतेपद मिळविले.स्पर्धेत मिळवलेल्या यशाची दखल घेवून
गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीला सर्वसाधारण उप विजेतेपद घोषित करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना प्रा.अभिषेक देशमुख, प्रा. पूर्वा अध्यापक, प्रा.जान्हवी कारेकर आणि प्रा.रेखा घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.प्राचार्य जयंत कित्तुर, प्रा.सतीश देशपांडे यांनी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्या बद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.