Monday, May 6, 2024

/

बेळगावमध्ये ३ दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल

 belgaum

बेळगाव : रेल्वे विकास निगमतर्फे तानाजी गल्ली रेल्वे गेट लेव्हल क्रॉसिंग जवळ रेल्वे लाईन डब्लिंग कार्य हाती घेण्यात आले आहे. यामुळे बेळगावमध्ये ३ दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ पासून २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रात्री ११ वाजेपर्यंत तानाजी गल्ली – फुलबाग गल्ली मार्ग बंद करण्यात आला आहे. यादरम्यान नागरिकांना रहदारीसाठी अडथळा येऊ नये ससाठी वाहनसंचार मार्गात बदल करण्यात आला आहे.

१) यश हॉस्पिटलकडून तानाजी गल्ली रेल्वे रुळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महाद्वार रोड, जुना पीबी रोड येथे वाहतूक वळविण्यात आली आहे.Cop

 belgaum

२) देशपांडे पेट्रोल पंपापासून तानाजी गल्ली रेल्वे रुळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी देशपांडे पेट्रोलपंप पासून पिंपळकट्टा, पाटील गल्ली, शनिमंदिर मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

३)शनिमंदिर, पाटील गल्ली, पिंपळकट्टा येथून तानाजी गल्ली रेल्वे रुळाकडून जाणाऱ्या वाहनांसाठी देशपांडे पंपापासून जिजामाता सर्कल, जुना पीबी रोड हा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.