Sunday, June 16, 2024

/

‘भू…स्वाधीन कार्यालयावर एसीबीचा छापा’

 belgaum

पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीची भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करून कमिशनची मागणी करणाऱ्या हिडकल डॅम येथील विशेष भू स्वाधीन अधिकाऱ्यांना धक्का देताना एसीबीने भूस्वाधीन कार्यालयावर काल गुरुवारी छापा टाकला. छाप्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पाटबंधारे योजनेसाठी भूसंपादन केलेल्या जमिनींची भरपाई हिडकल डॅम येथील भूस्वाधीन कार्यालयातून दिली जाते. मात्र अलीकडे संबंधितांना भरपाई देण्यास विलंब करण्याबरोबरच भरपाई मंजूर करण्यासाठी कमिशनची मागणी केली जात होती. त्याचप्रमाणे नुकसानभरपाई देताना एकाला एक तर दुसऱ्याला एक न्याय दिला जात होता. या पार्श्वभूमीवर विशेष भू स्वाधीन अधिकाऱ्यांच्या हिडकल डॅम येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस प्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक करूणाकर शेट्टी, पोलिस निरीक्षक ए. एस. गुदिगोप्प, एच. सुनीलकुमार, आर. एफ. देसाई, पी. जी. कवटगी, समीर मुल्ला यांच्यासह 35 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या छाप्याच्या कारवाई भाग घेतला होता. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू झालेली तपासणी आज शुक्रवारी देखील सुरू होती.

 belgaum

विशेष भू स्वाधीन अधिकाऱ्यांविरोधात एसीबीकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी तेथील कारभाराची माहिती काढली. सरकारी कामांसाठी लाच, कमिशन मागितले जात असल्याचे उघडकीस आल्यामुळे व दलालांकरवी बहुतेक कामे चालत असल्यामुळे एसीबीने त्या कार्यालयावर छापा टाकला आहे. या कारवाईत बेळगाव, बागलकोट, विजापूर व गदग जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी भाग घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.