15 वर्षाच्या वरील मुलांना लसीकरण करण्याच्या मोहिमेला बेळगाव जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्याच दिवशी 239 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले. एका दिवसात वीस हजार विद्यार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
मात्र बेळगाव जिल्ह्याने 47 हजार सातशे वीस मुलांना लस दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कर्नाटकात हावेरी जिल्ह्याने लसीकरणाच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला असून पहिल्याच दिवशी विक्रमी साठ हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात हावेरी जिल्हा ने आघाडी घेतली.
त्या पाठोपाठ बेळगाव जिल्ह्याने ही आघाडी घेतली असून कर्नाटकातील 10 जिल्ह्यांनी लसीकरणाच्या बाबतीत चांगले काम केले असल्याची माहिती राज्य सरकारकडून उपलब्ध झाली आहे.
धोका वाढत चालला आहे मुलांना या रोगाची लागण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील मुलांना लसीकरण केले जात असून बेळगाव जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे राज्य स्तरावर कौतुक होत आहे.