बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या बेंगळूर येथील विशेष न्यायालयाने चिकोडी येथील एकास दोषी मानले असून त्याला शिक्षा ठोठावली आहे. पाच वर्षाची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
गुरुवार दिनांक 6 रोजी न्यायालयाने हा निकाल दिला असून शहानवाज उर्फ शानू खान असे आरोपीचे नाव आहे. 12 मार्च 2018 रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
82 हजार रुपये किमतीच्या 41 बनावट नोटा त्याच्याकडे सापडल्या होत्या. याप्रकरणी 14 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल करून घेतला होता.
त्यानंतर 7 जून 2018, 10 डिसेंबर 2018 आणि 15 सप्टेंबर 2021 या दिवशी आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर आरोपीला पाच वर्षाची कैद आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
बनावट नोटा बाळगणे गुन्ह्यास पात्र ठरते. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.