कोरोना रुग्णांच्या संख्येत बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरूवारी नवीन 64 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 238 एकूण सक्रिय रुग्ण बेळगाव जिल्ह्यात आहेत. ही बाब गांभीर्याने घेण्याचा विषय असून प्रशासनाने तसेच नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक जानेवारी रोजी दहा रुग्ण आढळले होते. दोन जानेवारीला ही संख्या 12 इतकी झाली.
तीन जानेवारी रोजी 15इतकी झाली .4 जानेवारी रोजी 45, 5 जानेवारी रोजी 31 आणि आज 6 जानेवारी रोजी 64 रुग्ण दाखल झाल्यामुळे परिस्थिती बिकट बनत असल्याचे दिसून येत आहे .
मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचा वापर करण्याच्या बाबतीत होत असलेले दुर्लक्ष या रुग्ण वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रत्येक रुग्णावर उपचाराची व्यवस्था करण्यात आली असली तरी रुग्ण संख्या कमी होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पहिल्या आणि दुसर्या लाटेत बेळगाव जिल्ह्यातील अनेक रुग्ण दगावले आहेत. रुग्णांची संख्या तीन आकड्यात जाऊन पोचली होती अशा परिस्थितीत रुग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने आता योग्य ते परिश्रम घेण्याची गरज व्यक्त होत आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी औषध उपचार प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नागरिकांची खबरदारी या गोष्टी महत्त्वाच्या ठरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य विभाग तसेच बिम्स हॉस्पिटल प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान रुग्ण आणखी वाढू नयेत म्हणून आता खबरदारीची उपाययोजना घेण्याची गरज निर्माण झाली आहे.