छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रम आणि म्हैस पळविण्याच्या शर्यतीसाठी बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह 27 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
शहरातील चव्हाट गल्ली येथे गेल्या 14 जानेवारी रोजी आयोजित म्हैस पळविण्याच्या शर्यतीला आणि गेल्या रविवारी धर्मवीर संभाजी चौकातील
छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमाला कोरोना नियमांचे उल्लंघन करून उपस्थिती दर्शविल्याबद्दल भाजप आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यावर शहरात टीका होत आहे.
तथापि पोलिसांनी या संदर्भातील व्हिडिओ फुटेज पाहून कर्नाटक महामारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आमदार ॲड. बेनके यांच्यासह एकूण 27 जणांना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.