Thursday, June 20, 2024

/

सेवा बजावताना ‘या’ जवानाचे निधन

 belgaum

भोज (ता. निपाणी) गावचे सुपुत्र जवान विनय बाबासाहेब भोजे -पाटील यांचे सैन्य दलात सेवा बजावताना काल सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मूळचे भोज गावचे असले तरी तिळवणी (ता. हातकणंगले) येथे वास्तव्यास असणाऱ्या विनय भोजे -पाटील निधनसमयी 37 वर्षाचे होते. सध्या ते जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते

गेल्या कांही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड थंडी पडत असून थंडीबरोबरच बर्फाळ प्रदेशामुळे विनय यांचा ऑक्सिजन कमी झाला आणि त्यातच सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.

 belgaum

विनय भोजे -पाटील हे येत्या मार्च 2022 ला सैन्य दलातून सेवानिवृत्त होणार होते. परंतु दुर्दैवाने ते आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्यामुळे भोज -भोजवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.