Thursday, June 20, 2024

/

हयातभर न विसरता येणारे एन. डी. साहेब

 belgaum

एन. डी. साहेब सतत म्हणत असत कि प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांना सगळ्याच सुविधा आणि न्याय मिळत नसतो. जे वंचीत असतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यापरिने प्रामाणीक प्रयत्न करत रहा. तिथे जात,पात,पंथ,पक्षभेद विसरुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत रहा. कारण आमच्या देशात सर्व जाती धर्माचे शेतकरी,कष्टकरी आहेत. त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे.

महाराष्ट्र व इतर भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहात अत्यंत आस्थेने आ. एन.डी.साहेब लढतानां सदोदित दिसत, हे मी प्रत्यक्ष अनुभवलय. शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ रहात आपल्या सडेतोड विचारांशी कधीच तडजोड न करता अव्यहतपणे झटणारे खंबिर शिलेदार म्हणजे आ.एन.डी.साहेब.

मी लहानपणापासूनच त्यांचा चाहता आणि त्यांना आदर्श मानत आलोआहे. कारण सीमाप्रश्नाबरोबर येथील शेतकरी भोळाबाबडा आहे. त्यात यांची भाषा मराठी पण कर्नाटकात असल्याने सर्व कानडीत व्यवहार. त्यामूळे कर्नाटकातील इतर सर्व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोईसवलती येथील मराठी शेतकऱ्यांनाही मिळाव्यात यासाठी येथील प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या स्थानिक नेत्यांकडून जाणून घेत आंदोलन उभे करण्याचा सल्ला देत.

 belgaum
Nd patil
File pic Nd patil was belgaum mes protest

एन. डी. साहेब स्वत: जातिने हजर रहात. त्यावेळी सतत 1960 च्या साराबंदी लढ्यात येथील शेतकरी न्याय मिळवण्यासाठी कसा लढला याचे उदाहरण देत असत.
माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता पण त्या लढ्याची माहिती मात्र अनेक जेष्ठांकडून घेत असतो.

आमच्या वडगाव रयत गल्लीत 95 टक्के शेतकरी असल्याने सर्व वडीलधारीही त्यांच्या विचाराशी आणि लढ्याशी एकनिष्ठ रहात. साराबंदी लढ्यातही येळ्ळूर रस्त्यावर, बळ्ळारी नाल्यावर असलेले पूल पाडवण्यात कोणकोण अग्रेसर होते. त्यावेळचा गोळीबार, लाठिहल्ला कसा झाला आणि त्याला थोपवण्यासाठी कोणती व्यूहरचना करत असत हे प्रत्यक्ष भाग घेऊन सांगत असतानां ऐकल कि आम्ही त्यांच्यासमोर कस्पटासमान. शेतकऱ्यांचा लढा असो किंवा कष्टकरी त्यात हिरिरीने भाग घेण्याची तेव्हाची प्रथा अजूनही फक्त मीच नव्हे तर येथील शेतकरी कुळातील प्रत्येक युवकांनीही जोपासली आहे. आ. एन. डी. साहेब म्हणायचे कि जर शेतकऱ्यांवर अन्याय होतानां दिसत असेल तर तुमच्याबरोबर कितीजण आहेत याचा विचार करु नका.

लढ्यात प्रामाणीकपणे झोकून देतानां दहाजण खमके असलेतरी चालतील पण लढा. पण एक लक्षात ठेवा कि कोणतीही लढाई लढत असतानां त्यात जिंकलो कि हरलो हे ठरण्यासाठी शेवटपर्यंत लढत रहा. तेंव्हाच तुमची लढण्याची खरी ताकद दिसून येते.

आंम्ही 2002 पासून आजपर्यंत लढत असलेला हालगा-मच्छे बायपासचा लढातर मी त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लढत असून आज आम्ही न्याय मिळण्याजवळ येऊन ठेपलो आहोत. बळ्ळारी नाला खुदाई, कांही धनीक पीकाऊ शेतीत बेकायदेशीर जमीन विकत घेऊन तिथे पाडवत असलेले प्लॉट, बळ्ळारी नाल्यात होत असलेले धनीकांचे अतिक्रमण, शेतकऱ्यांच्या अनुमतीशिवाय प्रशासनाच्या मदतीने शेतीत होत असलेले रस्ते तसेच इतर अन्यायाबाबत लढत रहात. सरकारदरबारी, लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणून देण्यात मला जे प्रामाणीकपणे लढण्याच बळ प्राप्त झालयं ते फक्त आणि फक्त आदरणीय एन.डी.पाटील साहेबांमुळेच. त्यामूळे ते हयातभर स्मरणात रहातील. ते जरी आता नसलेतरी त्यांनी बहाल केलेली उर्जा, प्रेरणा म्हणजे आमच्या विचारातच त्यांची ज्योत तेवत राहो येवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि एन. डी. साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

– राजू मरवे, शेतकरी नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.