Friday, April 26, 2024

/

लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले दोन पोलीस

 belgaum

खानापुर स्थानकाच्या दोन पोलिसांना लाच घेताना जाळ्यात पकडण्यात आले आहे. मटका गुन्हा दाखल करण्याच्या दहशतीखाली लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

कॉन्स्टेबल सिद्धू मोकाशी आणि विठोबा चिप्पलकट्टी हे 15 हजारांची लाच घेताना एसीबी अधिकार्यांच्या तावडीत सापडले.

गेल्या शुक्रवारी बेळगाव येथील परशुराम गोदवददार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी या दोन्ही हवालदारांनी दिली होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. अखेर हा व्यवहार 15 हजार रुपयांना ठरला.Acb raid

 belgaum

लाच मागीतल्याप्रकरणी परशुराम गोडावदार यांनी सोमवारी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज लाच लुचपत घेतली जात असलेल्या ठिकाणी छापा टाकून दोन्ही हवालदारांना अटक केली. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

एसीबीचे एसपी बी एस न्यामगौडा, डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुडीगोप्पा आणि सुनीलकुमार आदी यामध्ये सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.