19 जानेवारी रोजी 390 नवीन कोविड प्रकरणे-बेळगाव जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी अर्थात आज एकूण 390 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, तर 115 रुग्णांना बरे झाले म्हणून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 2953 वर पोहोचली.
आज 1 मृत्यूची नोंद झाली आहे.
एकूण मृतांची संख्या आता 950 वर पोहोचली आहे.
राज्यात आज 40,499 नवीन प्रकरणे आली आहेत.
सकारात्मकता दर (शेवटचे 7 दिवस) – 7.43%
आज केलेल्या चाचण्या – 6515
बेळगाव तालुक्यात 316 नवी प्रकरणे मिळाली आहेत.