Saturday, December 21, 2024

/

अरे बापरे! 21 सरकारी कंपन्या तोट्यात

 belgaum

सार्वजनिक उपक्रम मंत्री एम टी बी नागराज यांनी विधानपरिषदेत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. राज्यातील एकूण 60 पैकी किमान 21 सरकारी कंपनी नुकसानीत आहेत.

तोट्यात असलेल्या कंपन्या वाहतूक, सिंचन, वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील आहेत.राज्यातील चारही रस्ते वाहतूक महामंडळे आणि दोन वीजपुरवठा कंपन्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, तोट्यात असलेल्या राज्य सार्वजनिक उपक्रमांमध्ये के एन एन एल, के एच डी सी एल, के आर डी सी एल, के एस टी डी सी, के एफ डी सी एल आणि श्री कंटीरवा स्टुडिओ लिमिटेड यांचा समावेश आहे.

कौन्सिलला दिलेल्या लेखी उत्तरात नागराज यांनी सांगितले की, संबंधित विभाग तोट्यात चाललेल्या सार्वजनिक उपक्रमांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. काही अजूनही लेखापरीक्षणाला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहेत, तर तोट्याचा प्रश्न पूर्णपणे सेवा-केंद्रित असलेल्या काही कंपन्यांना लागू होत नाही, असे ते म्हणाले.

कर्नाटक मूल्यमापन प्राधिकरण अशा उपक्रमांचे मूल्यमापन करते आणि अशा कंपन्यांच्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात, असे त्यांनी काँग्रेसचे आमदार प्रकाश के राठोड यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या 60 सार्वजनिक उपक्रमांमध्ये 1.94 लाख कर्मचारी आहेत, असेही मंत्र्यांनी नमूद केले.
म्हैसूरपेपर मिल्स चे अंदाजे 1,244 कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे, 2015 मध्येच तिचे उत्पादन बंद करण्यात आले. सरकारने निर्णय घेतला आहे की 1936 मध्ये सुरू झालेली ही मिल पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही आणि त्याचे कामकाज खाजगी ऑपरेटर्सना कंत्राटी पद्धतीने सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी सांगितले.

एमपीएम अंतर्गत असलेले वनक्षेत्र खाजगी कंपन्यांच्या ताब्यात दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने KIADB विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक उद्देशांसाठी 4,607 एकर जमीन संपादित केली होती, असेही निरानी यांनी सांगितले.
KIADB ने गेल्या तीन महिन्यांत एकूण 532.79 एकर जमीन 273 उद्योजकांना दिली आहे.

बेंगळुर शहरातील औद्योगिक क्षेत्रांसाठी केआयएडीबीने गेल्या दोन वर्षांत 67 उद्योजकांना 191.07 एकर जमीन दिली आहे, असे निरानी यांनी काँग्रेस आमदार एम नारायणस्वामी यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरासाठी बोलताना विधानपरिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.