Tuesday, January 21, 2025

/

बेळगावसह राज्यात 3 दिवस पावसाचा इशारा

 belgaum

बेळगाव कोल्हापूर पुणे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मंगळवार व बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस सुरू आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची रूपांतर बुधवारी चक्रीवादळात होण्यास सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. शनिवारी हे वादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार आहे. दरम्यान बेळगावसह कर्नाटकात व कोकण कोल्हापूरमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आणखी तीन दिवस राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण थायलँड ते अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर झाले आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात असा अचानक पाऊस येण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग्नेय अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पूर्व -मध्य अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानातील अचानक बदलामुळे महाराष्ट्रच नाहीतर इतर अनेक राज्यात पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे. यामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. अंदमान समुद्राच्या मध्यभागी असणारे कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम उत्तर आणि पश्चिमेकडे सरकेल, असा इशाराही हवामान तज्ञांनी दिला आहे.

याच कारणास्तव बुधवारपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. आतापर्यंत हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे घडले आहे.

आता हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे गुजरातमध्येही येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.