कोण ‘ए’ टीम, कोण ‘बी’ टीम याकडे आम्ही लक्ष देत नाही. मी मात्र ‘ए’ फॉर ए -वन आहे, असे स्पष्ट करून विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी आपले बंधू केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत केलं आहे.
केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी काल एका प्रचारसभेप्रसंगी लखन जारकीहोळी हे फक्त भाजपचे बंडखोर उमेदवारच नाहीत तर भाजपची बी टीम आहेत, असे वक्तव्य केले होते.
यासंदर्भात आज बुधवारी अपक्ष उमेदवार लखन जाकीरहोळी पत्रकारांशी बोलत होते. कोणी कांहीही म्हणोत मी केंव्हाही ए -वन म्हणजे ए टीम आहे. ए फॉर ए -वन. आमची ‘ए’ टीम आहे आणि खरतर त्यांचीच ‘बी’ टीम आहे, असे लखन म्हणाले.
आम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे असून आमच्याकडे जातीपातीला महत्त्व नाही. विकास साधणारा चांगला उमेदवार मतदारांनी निवडून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
सध्या निवडणुकीचा प्रचार करणे आणि मतदारांच्या गाठीभेटी घेणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. बाकीच्या गोष्टींना आम्ही महत्त्व देत नाही, असेही अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.