Thursday, January 2, 2025

/

अध्यक्ष महोदय, या कामाला का विलंब होतोय?

 belgaum

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत आज बुधवारी अधिवेशनात आवाज उठवून प्रश्न उपस्थित केला.

बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सध्या उत्तर कर्नाटकातील आमदारांना बहुतांश सार्वजनिक समस्यांवर आवाज उठवण्याची संधी मिळत आहे. त्या अनुषंगाने आज बुधवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगावात जवळपास गेल्या 4 वर्षापासून बनत असलेल्या बहुचर्चित अत्याधुनिक मध्यवर्ती बसस्थानक बांधकाम विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला. गेल्या 2017 साली या बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही. तब्बल 2 वर्षे हे काम का रखडले आहे? असा प्रश्न त्यांनी परिवहन खात्याच्या मंत्र्यांना विचारला. त्याचप्रमाणे कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई झाली? हे देखील स्पष्ट करावे असे ते म्हणाले.

आमदार ॲड. बेनके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, आमदारांची दिशाभूल करण्याची वेळ अजून तरी सरकारवर आलेली नाही. गेल्या फेब्रुवारी 2018 साली आम्ही ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2019 पर्यंत ते काम पूर्ण व्हावयास हवे होते. मात्र कोरोनामुळे कामाला विलंब झाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे कामगार कामावर आले नाहीत.Ad benke

त्यामुळे कामास विलंब झाला आहे असे सांगून बेळगाव शहरासह राज्यभरात गेल्या दोन वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त भरपूर पाऊस झाला आहे. पावसामुळे बसस्थानकाच्या बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे बसस्थानक नूतनीकरणाचे काम रखडले आहे, असे उत्तर उपमुख्यमंत्री कारजोळ यांनी दिले. आता संबंधित ठेकेदाराला आम्ही आणखी 2 वर्षाची वाढीव मुदत दिली आहे. तेंव्हा आगामी दोन वर्षात त्याच्याकडून बसस्थानकाचे काम पूर्ण होईल, असा विश्वासही मंत्री कारजोळ यांनी व्यक्त केला.

यावर बोलताना गेल्या फेब्रुवारी 2018 साली वर्क ऑर्डर दिल्यानंतर 2019 साल गेले. इतका कालावधी जाऊन देखील बसस्थानकाचे काम अर्ध्यावर देखील पूर्ण झालेले नाही. तेंव्हा आता योगायोगाने बेळगावात अधिवेशन असल्यामुळे खुद्द मंत्र्यांनीच त्या कामाची पाहणी करावी, अशी विनंती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सभागृहात उठून केली. त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन आम्हाला द्यावे अशीही विनंती त्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.