कोरोना आणि ओमिक्राॅन व्हेरीएंटच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ लागू करायचा की नाही? याबाबत उद्या रविवारी होणाऱ्या तज्ञांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना कोरोना आणि ओमिक्राॅन व्हेरीएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या जाव्यात या संदर्भात निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक सल्लागार समितीची उद्या रविवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत सर्वांची मतं अजमावल्यानंतर ओमिक्राॅन व्हेरीएंटला रोखण्यासाठी कोणती पावले उचलावीत याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यापूर्वीच येत्या 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2022 पर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांवर राजव्यापी बंदी घातली आहे.