Monday, November 18, 2024

/

ती संघर्ष पदयात्रा एक राजकीय स्टंट : डॉ. सरनोबत

 belgaum

खानापूर ते सुवर्ण विधानसौध संघर्ष पदयात्रा काढणे ही खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची फक्त स्टंट आहे. या दीर्घ पदयात्रेद्वारे त्या आमदारकीतील आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खानापूर हा मागासलेला तालुका असून याठिकाणी आजतागायत अनेक विकास कामे व्हावयास हवी होती. राज्यात 60 हून अधिक वर्षे सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्यात विकास कामेच राबवलेली नाहीत. कर्नाटकात भाजप सत्तेवर आल्यापासून अनेक विकास योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु स्थानिक आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना सरकारच्या योजना राबविण्यात अपयश आले आहे, असे डॉ सरनोबत यांनी सांगितले.

आता विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे आमदार डाॅ. अंजली निंबाळकर जाग्या झाल्या आहेत आणि त्यांनी विकास कामाबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. आमदार अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून जनतेत मिसळण्याऐएवजी त्या त्यांच्यापासून दूरच राहिल्या आणि त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता संघर्ष पदयात्रेच्या नांवाने त्या राजकीय स्टंट करण्यामध्ये व्यस्त झाला आहेत, असेही डॉ. सरनोबत म्हणाल्या.

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खरेतर विकास योजना आखून सरकारच्या मदतीने त्या राबवावयास हव्या होत्या. आपल्या मतदारसंघात त्यांनी नव्या विकास योजना आणावयास हव्या होत्या.

परंतु हे करण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे आता धरणे, निदर्शने वगैरे करण्यात कांहीच अर्थ नाही. जनता अशाच नेत्यांच्या मागे उभे राहते जे खरोखर प्रामाणिकपणे विकास कामे राबवण्यासाठी धडपडतात. राजकीय स्टंट अर्थात राजकीय नाटक करणाऱ्या नेत्यांवर जनतेचा विश्वास नसतो, असेही डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.