छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात मराठी नेते आणि युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांत न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे जामीनाची प्रक्रिया लांबवणीवर पडली आहे.
बंगळूर येथे धर्मवीर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात 17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात मराठी युवकांनी धरणे आंदोलन केले. शिवरायांचा पुतळा विटंबना करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आंदोलन करणार्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 61 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज आठवे जिल्हा सत्र न्यायालयात आय पी सी 307 वर खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपावर जामीन होणार होता. पण, न्यायालयाने अटकेत असलेल्या 38 आणि भूमीगत असलेल्या 23 जणांचा जामीन अर्ज नाकारला.मराठी नेते, कार्यकर्त्यांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर आदींनी काम पाहिले. जामीन नाकारल्याने जामीन मिळेपर्यंत अटक झालेले 38 जण कारागृहात तर भूमिगत असलेले 23 जण भूमिगत राहणार आहेत
पोलिसांनी अद्याप चार्ज शीट हरकत दाखल न केल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारला असल्याचे बोलले जात आहे आता या उच्च न्यायालयात दाद मागण्यांची शक्यता निर्माण झाली आहे.