Tuesday, June 25, 2024

/

नगरसेविकेच्या स्वच्छता मोहिमेमुळे समाधान

 belgaum

बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या पुढाकाराने गेल्या आठ दिवसांपासून प्रभागातील गटारी आणि ड्रेनेजची साफसफाई हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भांदूर गल्लीसह मुजावर गल्ली, तहसीलदार गल्ली आदी भागातील तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रभागाच्या नगरसेविका वैशाली भातखंडे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून महापालिका स्वच्छता विभागाच्या मदतीने ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आज भांदूर गल्ली येथील गटारी आणि ड्रेनेज पाइपलाइनची साफसफाई करण्यात आली.

या कामात स्वच्छता कर्मचाऱ्यांना गल्लीतील युवकांनीही सहकार्य केले. नगरसेविका वैशाली भातखंडे यांनी जातीने उभे राहून गटारातील गाळ आणि केरकचरा काढावयास सांगून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करून दिल्यामुळे भांदूर गल्लीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

प्रभागाच्या नगरसेविका झाल्यापासून वैशाली भातकांडे या नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या युद्धपातळीवर सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. अलीकडे तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज संदर्भात तक्रारी वाढल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून त्यांनी प्रभागातील गल्ल्यांमध्ये स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. त्यांच्या या कार्यतत्परतेचे प्रभागात कौतुक होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.