Tuesday, April 16, 2024

/

गिटार वादन स्पर्धेत आरपीडी कॉलेजचा सक्षम जाधव पहिला

 belgaum

युवजनोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या गिटार वादन स्पर्धेत आरपीडी कॉलेजचा सक्षम जाधव पहिला- नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवजनोत्सव कार्यक्रमात आर. पी. डी. महाविद्यालयाच्या कला शाखेचा विद्यार्थी सक्षम जाधव याने गिटार वादन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव, युवा सबलीकरण आणि क्रिडा खाते बेळगाव, नेहरू युवा केंद्र, बेळगाव आणि कर्नाटक राज्य युवा महासंघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर सर्कलनजिकच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्र आवारातील सभागृहात यंदाची जिल्हास्तरीय युवजनोत्सव स्पर्धा घेण्यात आली.

या युवजनोत्सव महोत्सवांतर्गत भरतनाट्यम, ओडिसी, कुचीपुडीसह अन्य शास्त्रीय नृत्य, जानपद नृत्य, जानपद गीत, एकांकिका, कर्नाटका व हिंदुस्थानी शास्त्रीय गायन तबला-पेटी, सीतार, वीणा, गिटार वादन अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
गिटार वादन स्पर्धेत सक्षम जाधव याने उत्कृष्टरीत्या गिटार वादन करून पाहिला क्रमांक पटकावला.

 belgaum

या जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्या क्रमांक मिळविल्याने त्याची निवड राज्यस्तरीय गिटार वादन स्पर्धेकरिता करण्यात आली आहे
त्याला फ्लाय म्युझिकल गिटार वादन प्रशिक्षण संस्थेचे गिटार प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन आणि आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य काशीनाथ मेलेद आणि कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचे प्रोत्साहन लाभले आहे. सक्षमने गिटार वादनासह कराटे स्पर्धेतही राज्यस्तरापर्यंत बाजी मारल्याने त्याचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.