बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खंजर गल्ली परिसरामध्ये महानगरपालिकेची अडीच एकर जमीन असून त्याठिकाणी मार्केट आणि रहदारी पोलीस स्थानक उभारण्यास ही जागा देण्यात यावी अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.
त्यांनी या जागेला भेट दिली त्या वेळी महापालिका अधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना मार्केट पोलीस स्टेशन आणि बेळगाव उत्तर रहदारी पोलीस त्यांच्यासाठी ही जागा योग्य असून त्याचा वापर त्या कारणासाठी करण्यात महानगरपालिकेने परवानगी द्यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित जागेवर अनेक गैरप्रकार सुरू आहेत.
मोकळी जागा असल्यामुळे अनेक गैर गोष्टी होऊ लागल्या आहेत. त्या प्रकरणी आता योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने त्या जागेचा सदुपयोग करून घेतला जाईल आणि या संदर्भातील सूचना आपण मनपा आयुक्त घाडी यांना दिल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली .
अनिल बेनके यांनी शहराच्या मध्यवर्ती मध्यवर्ती भागातील जागेच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमदारानी केले वाकेथॉन
आमदार अनिल बेनके यांनी वाहतूक पोलीस विभाग व महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत वॉकथॉन केली.
गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली व परिसराची पाहणी केली व व्यापारी बंधूंशी चर्चा करून त्यांना अशास्त्रीय वाहतूक व्यवस्था व छळवणुकीमुळे होत असलेल्या अडचणी व त्यांचे होणारे नुकसान याबाबत चर्चा केली.
फेरीवाल्यांनी मर्यादा ओलांडू नये आणि वाहतूक कोंडीचा मार्ग असलेला पादचारी रस्ता ताब्यात घेऊ नये, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आणि पुढे मी संबंधित विभागाच्या परिसरातील व्यावसायिकांना कळवले, त्यांना त्रास होऊ नये आणि विभागाने योग्य पार्किंग सुविधांसह वाहतूक सुरळीत व्हावी, याची काळजी घ्यावी.अशा सूचनाही देण्यात आल्या.