Wednesday, December 4, 2024

/

जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन

 belgaum

भरधाव वाळूवाहू टिप्परने चिरडल्याने १९ बकरी ठार झाल्याची घटना  बुधवारी बेळगाव तालुक्यातील  कडोलीजवळ घडली होती. या प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीसाठी मेंढपाळांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेलेली बकरी ठेवून निदर्शने केली.

बुधवारी सायंकाळी कडोलीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या कळपातील १९ बकऱ्यांना चिरडले होते. तर एक मेंढपाळ आणि दहा बकरी जखमी झाली होती. त्यामुळे कडोलीतील मेंढपाळ बिराप्पा भरमाप्पा शहापूरकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर वाहन न थांबविता चालक पळून गेला आहे. त्यामुळे टिप्परमालकाकडून भरपाई मिळवून द्यावी या मागणीसाठी बिराप्पा भरमाप्पा शहापूरकर व इतर मेंढपाळांनी मृत व जखमी बकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवत निदर्शने केली.

यावेळी मेंढपाळांना न्याय देण्याची मागणी करून केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील म्हणाले, हल्ली टिप्परचालकांची मनमानी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बोलावून ताकीद द्यावी. एका बकऱ्यासाठी सरकार देत असलेली ५ हजारांची भरपाई अपुरी असल्याने १५ हजार रु भरपाई द्यावी.
यावेळी मल्लप्पा यांनी टिप्पर चालकाच्या मनमानीची माहिती देऊन मेलेल्या बकऱ्यांबद्दल योग्य भरपाई देण्याची मागणी केली.

अपघातात जखमी झालेले फकीरप्पा शहापूरकर यांनी, टिप्पर चालकाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडून बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि आम्हीही धडकेने जखमी झालो आहोत. त्यामुळे योग्य भरपाई देण्याची मागणी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.