Wednesday, October 9, 2024

/

जर हवा असेल ‘शिवा’ तर तिथं लावला पाहिजे ‘दिवा’

 belgaum

कपिलनाथ युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील शिवतीर्थ अर्थात मिलिटरी महादेव मंदिर परिसरात विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर दिपोत्सव साजरा केला.

‘जर तुम्हाला शिवा पाहिजे तर तिथं दिवा पाहिजे’बेळगाव शहरातील मिलिटरी महादेव मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती समोर दिव्याची सोय नसल्याने नेहमी रात्री अंधार असतो.

काँग्रेस रोड वरून आणि रेल्वे उड्डाण पुलावरून ये जा करणारे अनेज जण त्या शिव मूर्तीला नमस्कार करत असतात परंतु अंधारामुळे शिव मूर्ती दिसत नसल्याने त्यांचा हिरमोड होतो.

Military mahadev
गुलामगिरीचा अंधःकार दूर करणाऱ्या शिवाजी महाराजांची मूर्ती मात्र अंधारात असावी ही बाब खेदजनक आहे. दिवाळीच्या दिपोत्सवाचे औचित्य साधत मराठा सेन्टरने शिवाजी महाराजांचा पुतळा कायमस्वरूपी प्रकाशात उजळून काढावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

कपिलनाथ युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याची दखल घेत हा परिसर स्वच्छ केला आणि या ठिकाणी दिपोत्सव करत दिवाळीच्या निमित्ताने मूर्ती परिसर झगमगीत केला.

लोकवर्गणीतून हा पुतळा मराठा सेंटरला देण्यात आला होता शिव प्रतिष्ठानने या कामी पुढाकार घेतला होता मराठा सेन्टरने या पुतळ्याची देखभाल करत कायमस्वरूपी पूजा अर्चा व्हावी अशी मागणी वाढू लागली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.