महापालिका निवडणूक आचारसंहिता काळात शहर परिसरातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात अबकारी खाते अपयशी ठरले. आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्याने अबकारी खात्याने नियंत्रण कक्ष सुरू करत अवैध मद्य विक्रीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव शहर तालुका आणि अबकारी खात्याच्या कार्यक्षेत्रात अबकारी नियमांचे उल्लंघन करून मांसाहारी हॉटेल्स आणि धाब्यांवर अवैद्य मद्य विक्री आणि मद्यसेवन होत आहे. अबकारी खात्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निवडणूक काळात बहुतेक हॉटेल्स आणि धाब्यांवर मद्यविक्री होऊनही कारवाई झाली नव्हती. आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्याने अबकारी खात्याने नियंत्रण कक्ष सुरू करत अवैध मद्य विक्रीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री प्रकरणाची माहिती 0831 -2475192 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्या माहितीच्या आधारे अबकारी खात्याकडून कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे. चिक्कोडी उत्तर जिल्ह्यासाठी नागरिकांना 08338 -275727 या क्रमांकावर माहिती देता येईल. अथणी, चिक्कोडी, गोकाक, हुक्केरी व रायबाग विभागातही कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे.