सलग तीन चार दिवस पाठपुरावा करून देखील रक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेर श्री कपिलनाथ युवक मंडळाच्या माध्यमातून शिवतीर्थावर फोकस लाईट बसवण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक कपिल भोसले यांच्या सहकार्यातून स्वखर्चाने शिवतीर्थावर लाईट फोकस बसवण्यात आले.शनिवारी स्वतः कपिलनाथ युवक मंडळाचे कार्यकर्ते शिव तीर्थ मैदानावर गेले व त्यांनी विद्युत लाईटची सोय करून छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती परिसर प्रकाशाने उजळला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन देशाची सेवा करणारी इतकी मोठी व नावलौकिक असलेली लाईट इंफंट्री व कॅटोंमेंट बोर्ड यापुढे तरी महाराजांच्या मूर्तीकडे दुर्लक्ष करणार नाही ही आशा ठेवूया अशी भावना यावेळी शिव प्रेमींतून व्यक्त झाली.विद्युत लाईट फोकस बसवल्या नंतर जय जिजाऊ जय शिवराय. च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
‘जर हवा असेल शिवा तर तिथं लावला पाहिजे दिवा’ या शीर्षकाखाली बेळगाव live ने वृत्त वेधले होते तसेच इतर अनेक माध्यमांनी याकडे लक्ष वेधले होते.
दरम्यान आज कार्यकर्त्यांनी स्वतः जाऊन शिवरायांसमोर दिवा बसविला आहे. यामुळे बेळगाव आणि परिसरात शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे याचे दर्शन झाले. याकामी पुढाकार घेणाऱ्या कपिलनाथ युवक मंडळ आणि युवा उद्योजक कपिल भोसले यांचे कौतुक होत आहे.
*जर हवा असेल ‘शिवा’ तर तिथं लावला पाहिजे ‘दिवा’*