Wednesday, January 8, 2025

/

शहरात किन्नरांच्या खाद्यपदार्थ गाडीचे उद्घाटन

 belgaum

बेळगावातील केवळ किन्नरांकडून चालविल्या जाणार्‍या पहिल्या फुड कार्ट अर्थात अन्नपदार्थांच्या गाडीचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

शहरातील गृहिनींकडून चालविल्या जाणाऱ्या इनरव्हील क्लबतर्फे ही किन्नरांची खाद्यपदार्थांची गाडी पुरस्कृत करण्यात आली आहे. किन्नर समाजाच्या सक्षमीकरणासाठी क्लबने ही 45 हजार रुपये किंमतीची फुड कार्ट देऊ केली आहे. सदर फुड कार्ट अर्थात अन्नपदार्थांच्या गाडीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 317 च्या चेअरमन रत्ना बेहरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते फीत कापून गाडीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा सुषमा शेट्टी, गौरी गजबर आदींसह पदाधिकारी, सदस्य आणि किन्नर उपस्थित होते.

सुषमा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इनरव्हील क्लबतर्फे बेळगावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच गोरगरीब गरजू लोकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य सुरू आहे. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी मदत निधी देण्यापासून झोपडपट्टीमधील मुलांना खेळणी वाटप करण्यापर्यंतचा उपक्रमांचा समावेश असतो. गरजूंना भाजीपाला विक्रीसाठी हात गाडी उपलब्ध करून दिल्यानंतर आता क्लबतर्फे खाद्यपदार्थांची गाडी उपलब्ध करण्यात आली आहे.Food cart

अलीकडेच बेंगलोरहून बेळगावला माघारी परतलेला किन्नरांचा एक समूह खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात कांहीतरी करू पाहत होता. यासंदर्भात त्यांनी सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर यांची भेट घेतली. निप्पाणीकर यांनी त्यांची गाठ सुषमा शेट्टी व गौरी गजबर यांच्याशी घालून दिली.

सध्या या किन्नरांची खाद्यपदार्थांची गाडी मध्यवर्ती बसस्थानका नजिकच्या इंदिरा कॅन्टीन शेजारी सुरू झाली आहे. यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाने त्यांना तात्पुरती जागा दिली आहे. पुढे मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या आश्वासनेप्रमाणे अन्नपदार्थांच्या या गाडीसाठी निश्चित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.