कल्लेहोळ क्रॉस येथे घडलेलं खून प्रकरण केवळ आठ दिवसांत काकती पोलिसांनी सोडवत दोघांना अटक केली आहे.कल्लेहोळ क्रॉसजवळ गेल्या 14 ऑक्टोबर रोजी पहाटे रामचंद्र लक्ष्मण कणबरकर (वय 31, रा. उचगाव) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला होता. डोक्यात अज्ञातांनी बियर बाटलीने जबर मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रामचंद्र याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
रामचंद्र प्रमोद मुचंडी वय 21 कोनवाळ गल्ली शिवाजी रोड बेळगाव,नागेश नामदेव गावडा वय 20 गावडे गल्ली उचगाव अशी खून प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मयत तिघे मित्र होते वेंगुर्ला रोडवरील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. त्या ठिकाणी आरोपीसोबत झालेल्या भांडण व वादावादीनंतर खुनाचा प्रकार घडला आहे.क्षुल्लक कारणावरून त्यांचे भांडण झालं आरोपींनी त्याच्या डोक्यावर बाटलीने हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला होता दुसऱ्या दिवशी त्याचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.
दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्याने खून केल्याचे त्यांनी तपासात कबूल केलं आहे
खुनाचा छडा आठच दिवसांत लावल्याने गणपती गुडाजी ग्रामीण ए सी पी, काकती पोलीस निरीक्षक आणि सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले आहे