श्वासोच्छवासाचा त्रासामुळे एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 2:30 च्या सुमारास नेहरूनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये घडली.
हेमा बेंझील तावरो (वय 32, मूळ रा. हुबळी, सध्या रा. अन्नपूर्णावाडी बेळगाव) असे दुर्दैवी मयत महिलेचे नांव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की अन्नपूर्णावाडी येथील हेमा तावरे या 8 महिन्याच्या गर्भवती होत्या.
मात्र काल शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांना अचानक श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नेहरूनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र अडीचच्या सुमारास उपचाराचा फायदा न होता त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती समजताच आज सकाळी एपीएमसी पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेची एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.