Sunday, September 8, 2024

/

13.92 लाखाहून अधिकांचे निरीक्षण पूर्ण : नव्याने फक्त 2 रुग्ण

 belgaum

गेल्या चोवीस तासात बेळगाव जिल्ह्यात नव्याने फक्त 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे आज गुरुवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 79 हजार 804 इतकी झाली आहे. याबरोबरच आजपर्यंत जिल्ह्यातील 13,92,128 व्यक्तींचे कोरोना वैद्यकीय निरीक्षण पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यात सध्या 115 सक्रिय रुग्ण आहेत.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 2 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 79,804 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज गुरुवारी दि. 7 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 13,92,128 व्यक्तींचे कोरोना वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 48,232 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 115 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 60309 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 1283472 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 1391036 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 79804 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज गुरुवारी नव्याने आढळलेल्या 2 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 1305827 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 115 आहेत. त्याचप्रमाणे 575 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात मृतांची संख्या एकुण 935 झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून 78754 रुग्ण मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज गुरुवारी आढळलेल्या 2 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 1 आणि हुक्केरीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.