कर्नाटक हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागाने त्यांच्या नियंत्रणाखालील मंदिरांना दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी ‘गोवर्धन पूजा’ करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
“दिपावली उत्सवाचा एक भाग म्हणून या दिवशी सर्व मुजराई मंदिरांमध्ये गो पूजन करण्याचे निर्देश देणार्या राज्य कर्नाटक सरकारच्या आदेशाचे मी मनापासून स्वागत करतो,” असे ट्विट कर्नाटकचे लघु आणि मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांनी बुधवारी केले.
ते म्हणाले, “गाय हा पवित्र प्राणी आहे आणि आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.” दीपावलीनंतरचा दिवस देशाच्या बहुतेक भागांमध्ये गोवर्धन पूजा म्हणून साजरा केला जातो जेथे आंघोळ, सजावट आणि गायींची पूजा केली जाते.
हीच संस्कृती कर्नाटकातील सर्व मंदिरांनी पाळावी असे आवाहन कर्नाटक सरकारने केले असून त्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे त्यामुळे सर्व मंदिरांना गोपूजा करणे बंधनकारक असणार आहे.