belgaum

कर्नाटकात सर्वत्र तुफान आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने यलो अलर्ट जारी केला आहे.

bg

बेळगावसह 19 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे .या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडून कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश त्या-त्या जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असून काळजी घेण्याची आणि प्रतिबंधात्मक तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

कारवार, मंगळूर ,उडपी, बागलकोट, धारवाड ,गदग ,हावेरी ,कोप्पळ विजापूर, चिकबळापुर ,चित्रदुर्ग दावणगिरी, बेंगलोर, तुमकुर, बेंगलोर ग्रामीण, कोलार आणि रामनगर आदी जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वादळाच्या फटक्यामुळे हा पाऊस येणार असून या काळात यलो अलर्ट जारी केला जाणार आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगावी. पावसाच्या काळात प्रवास करताना काळजी घ्यावी. त्याचबरोबरीने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या भागात प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात अशी सूचना हवामान खाते आणि कर्नाटक सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासनाना केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.