Friday, January 3, 2025

/

कर्जबाजारी विणकराची गळफास घेऊन आत्महत्या

 belgaum

कर्जबाजारी विणकराने दोन मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून नैराश्येच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जोशीमळा खासबाग येथे काल गुरुवारी दुपारी उघडकीस आली.

पांडुरंग रामचंद्र उपरी (वय 54, रा. उप्पार गल्ली, खासबाग) कसे आत्महत्या करणाऱ्या विणकाराचे नांव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत पांडुरंग यांचे घर कोसळले होते. नवीन घर बांधण्यासाठी त्यांना राज्य सरकारच्या योजनेतून 2 लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. मात्र 3 लाख रुपयांचा दुसरा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट पडले आहे. त्यातच त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेतून 4 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच हातमाग उघड्यावर पडल्याने त्यांच्या हातात काम आहे नव्हते.

लॉक डाऊनमुळे बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. भरीस भर म्हणून पोटच्या दोन्ही मुली वयात आल्याने त्यांच्या लग्नाची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे जीवनाला कंटाळून नैराश्येच्या भरात त्यांनी गुरुवारी सकाळी 9:30 ते दुपारी 1 च्या दरम्यान जोशीमळा खासबाग येथील श्रीनिवास शिंदे यांच्या खुल्या जागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

विष प्राशन केल्याने अत्यवस्थ झालेल्या सदलगा (ता. चिक्कोडी) येथील एका युवकाचा उपचाराचा फायदा न होता सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

सदलगा येथील विष प्राशन केलेल्या एका युवकाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. सदलगा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. संतोष सदाशिव मल्लण्णावर (वय 27, रा. सदलगा) असे मयत युवकाचे नांव आहे. विष प्राशन केल्यामुळे मंगळवारी त्याला अत्यवस्थ अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. मयत युवकाने विषप्राशन करण्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.