Thursday, May 2, 2024

/

‘त्या’ कुटुंबियांचे ‘यांनीही’ भेट घेऊन केले सांत्वन

 belgaum

बडाल अंकलगी येथे घराची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची आज माजी महापौर शिवाजी सुंठकर, डीसीसी बँकेचे सदस्य राजू अंकलगी आणि एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

बडाल अंकलगी येथे गेल्या बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भिमाप्पा खनगावी यांच्या कुटुंबातील 6 जण सदर दुर्घटनेत ठार झाले.

खनगावी कुटुंबातील भिमाप्पासह दोघेजण सुदैवाने बचावले. आज शनिवारी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह डीसीसी बँकेचे सदस्य राजू अंकलगी आणि एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी भिमाप्पा याच्यासह मृत व्यक्तींच्या अन्य वारसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून सांत्वन केले. B Ankalagi

 belgaum

त्याचप्रमाणे कांही अडचणी -समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी बडाल अंकलगी गावातील पंच मंडळी व गावकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.