Wednesday, April 24, 2024

/

अपार्टमेंट आवारात शिरलेल्या सापाला जीवदान

 belgaum

आगरकर रोड टिळकवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये साप शिरल्याने घबराट पसरल्याची घटना आज घडली. तथापी सर्पमित्रांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनखात्याकडे सुपूर्द केले.

आगरकर रोड येथील श्री गंधा अपार्टमेंटच्या आवारात आज बुधवारी सकाळी एक साप शिरल्याचे नजीकच खेळत असलेल्या मुलांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या कानावर घालताच रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व राहुल देशपांडे यांना सापाबद्दल माहिती दिली.

त्या उभयतांनी कॅम्प येथील सर्पमित्र इरफान यांना तात्काळ पाचारण केले. इरफान यांनी शिताफीने सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनखात्याच्या स्वाधीन केले. इरफान यांनी सापाला पकडताच अपार्टमेंटमधील घाबरलेल्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. श्री गंधा अपार्टमेंटच्या आवारात शिरलेला सदर साप हा रॅट स्नेक असल्याचे असल्याचे सांगून तो बिनविषारी असतो, असे इरफान यांनी स्पष्ट केले.Snake rescue

 belgaum

दरम्यान, कोणताही साप हा त्याला डिवचल्याखेरीज मनुष्यावर हल्ला करत नाही. मुळात सरपटणारा हा वन्यप्राणी अत्यंत शांत स्वभावाचा असतो. तेंव्हा आपल्या घराच्या आसपास साप आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊन कृपया या त्याला ठार मारू नये अथवा त्याच्यावर हल्ला करू नये.

साप आपल्या मार्गाने निघून गेला तर ठीक अन्यथा सर्पमित्रांना बोलावून सापाला ताब्यात घेण्यास सांगावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.