Sunday, June 16, 2024

/

ऑपरेशन कमळ; भाजपकडून पैशाची ऑफर :श्रीमंत पाटील

 belgaum

काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला मी म्हणेन तितका पैसा देण्याची ऑफर भारतीय जनता पक्षाने दिली होती.

परंतु मी पैशाची अपेक्षा न करता पक्षात चांगले स्थान मिळावे अशी मागणी केली होती, अशी खळबळजनक माहिती माजी मंत्री आणि कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली.

कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावातील विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर माजी मंत्री श्रीमंत पाटील पत्रकारांशी बोलत होते.

 belgaum

काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पैशाची ऑफर देण्यात आली होती हे खरे आहे. तथापि समाजाचे हित साधण्यासाठी मी चांगले मंत्रीपद आपल्याला मिळावे ही मागणी समोर ठेवली होती, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातून श्रीमंत पाटील यांना वगळण्यात आले. याचा निषेध करून मराठा समाजातर्फे आंदोलनंही करण्यात आली. यासंदर्भात बोलताना मला मंत्री मंडळातून वगळण्यात आल्याचा अनुषंगाने माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच त्यांनी भावी काळात मला मंत्रीपद मिळेल असा विश्वास व्यक्त केला असल्याचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.