Tuesday, July 23, 2024

/

एकनाथ शिंदे यांनी बेळगावचा दौरा करावा -रवी साळुंखे यांची मागणी

 belgaum

बेळगाव मनपातील प्रभाग 27 चे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंके यांनी बेळगाव सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेत नगरविकास मंत्र्यांनी बेळगावचा दौरा करावा अशी विनंती केली.

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवणूकीसाठी मराठी भाषिक आमदार निवडून यावेत यासाठी समन्वयक मंत्री शिंदे यांनी बेळगावसाठी रणनीती ठरवावी यासाठी बेळगावात त्यांनी यावे अशी विनंती केली.

त्यावर कोविड मूळे तांत्रिक परवानगीच्या मनपा निवडणुकी दरम्यान मी बेळगावला येऊ शकलो नाही मात्र आगामी काही दिवसांत बेळगाव दौरा करेन असे आश्वासन त्यांनी दिले.

Eknath shinde
साळुंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनसे ठाणे जिल्हा मनसे अध्यक्ष कार्यालयात जाऊन यांची देखील भेट घेतली. यावेळी अविनाश जाधव यांनी साळुंके यांचा सत्कार केला.

यावेळी बेळगाव प्रतीक गुरव ,आनंद टपाले,दशरथ नांगरे,सुमंथ जाधव, अप्पाजी बस्तवाडकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.