Friday, April 26, 2024

/

पुन्हा पेटवा स्वाभिमानाच्या मशाली….

 belgaum

भक्तीभावाने ओथंबलेला मराठी माणूस ,परंपरेने चालत आलेला मराठी गणेश उत्सव, मराठी गाण्यावर थिरकनारी तरुणाई,गणपती बाप्पा मोरया चा मराठी जय घोष, आणि या सगळ्यावर जखमेतून वाहवा तसा कानडी अक्षराचा पू!!जखम तर मराठी माणसाला झालीच आहे कुणी केली?का केली? कशी केली.. याचा उहापोह होतच राहील,पण मराठी मनाच्या काळजाला लागलेला काटा आता भळभळतच राहील!

सत्तेच्या साठमारीत मराठीचा गज बुरुजाला धडका देत आहे. कानडीकरणाचे भाले टोचवत कानडी लोकप्रतिनिधी नाचत आहेत. राज्यपदावर असणारी आमची मराठी लोकं कर्नाटक सरकारच्या पायघड्या उचलण्याच्या कामाला लागली आहेत.मराठीचा असलेला हुंकार, आता हुंदक्यात बदललेला आहे. कारण घरचाच मालक घरगडी बनला आहे.जिथं फुल वेचली तिथं गोवऱ्या वेचायची पाळी मराठी माणसाने मराठी माणसावर आणली आहे.

पानिपतचा इतिहास सांगतो की मराठ्यांना हरवायला अब्दालीचा पराक्रम लागला नाही, तर मराठ्यांना हरवायला मराठीच कारणीभूत ठरले.एखाद्या कार्यात यशस्वी व्हायचं असेल तर संख्या किती मोठी आहे यापेक्षा मनं किती एकत्र आहेत हे महत्त्वाचं आहे.46 टक्के मराठी मते फुटली आणि मराठीच बाटली.Kapileshear talav

 belgaum

डौलाने फलकावर नांदणारी मराठी आज गायब झाली आहे.निवडणूक काळात मराठी पत्रकं वाटून मताचा जोगवा मागणाऱ्यानी मराठीलाच इथं बेवारस केलं आहे.गणेश विसर्जनाच्या निमित्ताने जुन्या आणि नवीन कपिलेश्वर तलावावर मनपाने उभारलेल्या मंचावर मराठीला फाटा देत केवळ कन्नड मध्ये मजकूर लिहिण्यात आलाय.सर्व गणेश भक्तांचे स्वागत असे केवळ कन्नड मध्ये लिहून पुन्हा एकदा मनपा प्रशासनाने मराठीची गळचेपी केली आहे.यावर विसर्जना दरम्यान गणेश भक्तातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

नुकतीच मनपा निकडणुक झाली आणि शासकीय फलकावर मराठी गायब झाली.बंगळुरूला जाऊन भगवे फेटे मिरवून आलेल्यानी आपल्या आईलाच वृद्धाश्रमात पाठवले आहे.!! असा आरोप केला जात आहे.मराठी माणसांनो खाटक्याची सुरी कधीच बकऱ्या वर प्रेम करत नाही हाच संदेश या कृतीतून मराठी माणसाला मिळाला आहे.

महानगरपालिकेने उभ्या केलेल्या व्यासपीठावरील फलक फक्त कन्नड मध्येच लावल्यामुळे मराठी भाषिक कार्यकर्ते संतप्त झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि अधिकाऱ्यांना विचारला जाब, नजरचुकीने झाल्याचे सांगून मान्य केली चूकपुढील वर्षी होणार दोन्ही भाषेत फलक लावू असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.