बेळगाव मनपा निवडणुक पारदर्शक झाली नाही. यामध्ये असंख्य गैरकारभार झाले असून योग्य ती चौकशी करावी अशी तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगावातील एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते पियुष हावळ यांनी ही तक्रार केली आहे.
या संदर्भात एक ऑनलाईन तक्रार करण्यात आली असून ही तक्रार महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने स्वीकारली आहे. आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन तक्रारदाराला देण्यात आले आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत समितीचा पराभव झाला आणि भाजप चे वर्चस्व प्रस्थापित झाले. अनपेक्षित असा निकाल लागण्यासाठी गैरकारभार कारणीभूत असल्याचा आरोप झाला.
निवडणुकीत व्हीव्हीपॅट चा वापर न करता मतदान घेण्यात आले. याबाबत असंख्य तक्रारी निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्र सरकारलाही याची दखल घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान सदर निवडणूक प्रक्रिये विरोधात न्यायालयात आवाहन देण्यात येणार असून लवकरचं याचिका दाखल केली जाणार आहे त्याच दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास देखील ही बाब आणून दिली गेली आहे.
महाराष्ट्र शासनाला पाठवलेलं पत्र असे
प्रति.
मा. श्री शरद पवार
माजी केंद्रीय कृषी मंत्री
राज्यसभा खासदार.
अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
महाराष्ट्र राज्य
विषय :- बेळगाव महानगर पालिका निवडणूक २०२१ पारदर्शक झाली नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरकारभार संबधी चौकशी करणे बाबत.
सन्मानीय महोदय,
बेळगाव महानगर पालिका निवडणूक 2021 मध्ये खालील प्रमाणे त्रुटी आढळून आल्या आहेत.
१) मतदारांना, नागरिकांना विश्वासात न घेता तसेंच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवता अत्यंत कमी वेळेत घिसडघाईत निवडणूक प्रक्रिया पार पाडली. वार्ड पुनरर्चना आणि वार्ड आरक्षण संबधी उच्च् न्यायालयात खटला प्रलंबित असताना देखील निकाल येण्या आधी राज्य निवडणूक आयोगने निवडणूक लादल्या.
२) एकीकडे कोरोना मुळे नैसर्गिक आपत्ती असताना टास्क फोर्स ने निवडणूक घेण्यास मनाई केली असताना निवडणूक घेण्याची घाई करण्यात आली.
3) सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलुन EVM मशीन सोबत VVPAT न जोडल्याने मतदारांना स्वतःचे मत कोणत्या उमेदवराला गेले हे पाहण्याचे अधिकार मिळाले नाही. त्यामुळे लोकसभा , विधानसभा निवडणुकीत वापरलेली EVM सोबत VVPAT ची यंत्रणा महापालिका निवडणुकीच्या वेळी वापर नसल्याने सदोष वाटत आहे.या बद्धल जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कडे ३१ ऑगस्ट रोजी तक्रार करून देखील त्या संबधी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
4) EVM द्वारे मतदान कसे पार पडेल तसेंच EVM सोबत VVPAT जोडणार अथवा नाही याबाबत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदार तसेंच उमेदवारांना संपूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले.
5) हजारो मतदारांची नावे मतदार यादि तुन वगळल्याने मतदार याद्या सदोष होत्या. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासुन वन्चित राहावे लागले.
6) अनेक वार्डात दुबार मतदारांची नावे असल्याने बोगस मतदान झाल्याची शंका आहे.
7) शेकडो मृत मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याने त्या द्वारे देखील बोगस मतदान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
8) बेळगाव महानगर पालिका हद्दी बाहेरील नावे मतदार यादीत समाविष्ट करून बोगस मतदान झाले आहे. याचाच अर्थ अनेक नागरिकांकडे दोन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असण्याची शक्यता आहे.
बेळगाव महानगर पालिका निवडणूक पारदर्शक पणे पार न पडल्यामुळें मतदारांचा लोकशाही वरील विश्वास उडाला आहे.
लोकशाहीचे पावित्र्य टिकवयचे असल्यास तसेंच मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी निवडणूक आयोगने संपूर्ण मतदान प्रक्रियेची सखोल चौकशी करून त्या संबधित संपूर्ण अहवाल जनतेसमोर् ठेवण्याची मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेंच राज्य निवडणूक आयोग व् केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या कडे निवदन द्वारे केली आहे.
बेळगाव महानगर पलिके वरील मराठी माणसाची सत्ता सम्पविण्यासाठी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा प्रकार घडवुन आणल्याचा संशय आहे. सीमा प्रश्न आता बेळगाव चा केंद्रबिन्दु राहिला नसून लोक या पासून दूर गेले आहेत असे खोटे चित्र या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.
निवडणुकी मध्ये अनेक ठिकाणी समितिचा एक उमेदवार असताना देखील प्रचार न् केलेले आणि जनतेत् ओळख नसलेले राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार निवडून येणे संशयाला वाव देणारे आहेत.
अनेक ठिकाणी उमेदवारांना त्यांच्या घरची मते न् मिळणे देखील संशयास्पद् आहे.
मतदार देशा बाहेर असताना त्यांच्या नावचे मतदान देखील झाले आहे.
हा संपूर्ण प्रकार एक मोठा गैर प्रकार असून लोकशाही वरील काळा डाग आहे. लोकशाही चे अस्त्र कमकुवत् करणे आहे.
तरी सिमाभागातील सदर परिस्थिती हि गंभीर टप्यावर् असून या संबधी न्यायालयातील व रस्त्यावरील लढाई तीव्र होणे गरजेचे आहे. जिल्ह्या आणि राज्य उच्च् न्यायालयात कितपत न्याय मिळेल याबाबत् सशन्कता आहे. आपल्या प्रयत्नाने सर्वोच्च् न्यायालयात या बाबत जनहित याचिका दाखल व्हावी व सीमा वासियांना तसेच लोक शाही वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना न्याय मिळावा हिच अपेक्षा.
आपला कृपाभिलाशु
पियुष नंदकुमार हावळ
11-09-2021
बेळगांव