Friday, January 24, 2025

/

आमदार या रस्त्याकडे कधी लक्ष देणार?

 belgaum

ए. पी एम सी रोड, सदाशिव नगर, नेहरू नगर ,बसवण मंदिर समोर, आझम नगर, बसवण मंदिर समोर, संगमेश्वर नगर, आझम नगर सर्कल पर्यंत चा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. याकडे आमदारांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

हा संपूर्ण रस्ता  खड्डे आणि त्यात साचलेले पाणी असा बनला आहे. या रस्त्यावर कोठेच खडी किंवा डांबर शिल्लक नाही. ही अवस्था दूर करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्याची गरज आहे.

Road repair demand
या रस्त्यावरून ये-जा करणे मुश्किल झाले आहे व दररोज अपघात घडत आहेत .एपीएमसी कडे जाणाऱ्या भाजीपाला गाड्या तसेच इतर धान्य सामानाची वाहतूक त्या मार्गावर जात असताना कठीण झाले आहे.याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.

 belgaum

आमदार या भागाकडे दुर्लक्ष करीत आहेत. हा नागरिकांचा आरोप आहे. या मार्गावरील काही भाग बेळगाव उत्तर मतदारसंघात तर काही भाग बेळगाव ग्रामीण मतदार संघात येत असताना या भागातील आमदारांना आमच्या व्यथांचे काहीच पडलेले नाही असे नागरिक बोलून दाखवत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.