पोक्सो गुन्ह्याशी संबंधित एक आरोपीने पोलिसांच्या हातावर चवळी देऊन धूम चटक होण्याचा प्रकार केला.पण तासभर शोध घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
काकती पोलीस स्थानक हद्दीत एक पोक्सो गुन्हा झाला आहे.याप्रकरणी मेडिकल चेकिंग साठी पोलिसांनी त्या संशयिताला सिव्हिल मध्ये आणले होते. पण पोलीस आपल्या याद्या बनवण्यात गुंतलेले असताना तो फरार झाला.
मेडिकल करण्याआधीच त्याने गुंगारा दिल्याने पोलिसांची पळता भुई थोडी झाली होती. पण त्यांनी सगळीकडे यंत्रणा फिरविली आणि त्याला पुन्हा पकडून आणले आहे. याकाळात पोलिसांची बरीच धावपळ झाली आणि त्यालाही पळून जाण्याचा कोणताच फायदा झाला नाही
संतापलेल्या पोलिसांचे फटके खात पोलीस जीप मधून परत आणल्या गेलेल्या त्या संशयिताचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.
पोक्सो कायदा काय आहे? (इंग्लिश:POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.