महिला आणि मुलांवरील विविध गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांसह नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन एनजीओने विविध गावे आणि शहर भागात महिला आणि मुलांसाठी कायदेशीर जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय केला आहे.
या शिबिरांमध्ये घरगुती हिंसा,बलात्कार प्रकरणे, POCSO, महिलांची तस्करी,सायबर गुन्हे,वाहतुकीचे नियम,आईंनी त्यांच्या मुलीची घ्यावी लागणारी वैयक्तिक काळजी आणि निरीक्षण,बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध आणि महिलांची भूमिका, ईव्ह टीझिंग तसेच बालविवाह आणि बालकामगार कायदा या विषयांवर विशेष जागृती केली जात आहे.
या अंतर्गत 16 ऑगस्ट रोजी बेळवट्टी आणि बिजगर्णी गावात जागृती कार्यक्रम घेण्यात आला.17 ऑगस्ट रोजी सोनोली व बेळगुंदी,18 ऑगस्ट रोजी मच्छे तसेच आज कडोली आणि केदनूर गावात जागृती करण्यात आली आहे.
ही जागरूकता मोहीम सुरू राहील आणि बेळगावी शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत सर्व गावे आणि शहर भाग व्यापेल अशी माहिती देण्यात आली आहे.
डीसीपी (एल अँड ओ) डॉ विक्रम आमटे,कर्नाटक राज्याच्या राष्ट्रीय महिला महासचिव प्रमोदा हजारे आणि टीम तसेच आजच्या जनजागृती कार्यक्रमावेळी महिला पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील आणि त्यांची टीम उपस्थित होती.