Monday, April 29, 2024

/

अन ती सेल्फी अखेरची ठरली….

 belgaum

सेल्फीचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही, पण सेल्फी घेताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही तर जीव गमवावा लागतो. असाच एक प्रकार गोकर्ण येथील ओम बीचवर घडला असून, एक सेल्फी त्या तरुणासाठी अखेरची ठरली आहे.
उत्तर कर्नाटकातील हनगल तालुक्‍यातील पर्यटक कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्‍यातील गोकर्ण येथे गेला होता.अरबी समुद्राच्या ओम बीचवर तो समुद्रात वाहून गेला आहे. समुद्रात वाहून गेलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून तो ३५ वर्षीय तरुण कुमार शेकाप्पा आहे.
कामती किनाऱ्यावरील दगडांवर उभे राहून सेल्फी घेत असताना तो समुद्राच्या आत ओढला गेला.

कुमार समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या 12 सदस्यीय पर्यटकांच्या गटांपैकी एक होता. जेव्हा तो सेल्फी घेत होता तेव्हा जोरदार वादळ किनाऱ्यावर आदळले आणि त्याला समुद्राच्या आत ओढले गेले.

वादळ इतके वेगाने होते की कुमारला वाचवण्यासाठी लाइफ गार्ड्स वेळेत पोहोचू शकले नाहीत. लगेचच त्याला पकडण्यास आणि वाचवण्यास सुरुवात केली पण उपयोग होऊ शकला नाही. गोकर्ण पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाचा तपास सुरू केला आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.