काँग्रेस नेते, माजी मंत्री विनय कुलकर्णी जे सुमारे नऊ महिने बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात होते, त्यांची शनिवारी, 21 ऑगस्ट रोजी जामिनावर सुटका झाली.
यावेळी त्यांचे जोरदार स्वागत झाले. दरम्यान स्वतः कुलकर्णी आणि त्यांच्या 300 समर्थकांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.
त्याना गुरुवारी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला होता, मात्र कारागृह प्रशासनाला आदेशाची प्रत न मिळाल्याने दोन दिवसानंतर शनिवारी सुटका करण्यात आली.
यावेळी बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली 300 जणांनी त्यांचे कारागृहाबाहेर स्वागत केले.यावेळी कोविड च्या नियमांचा भंग झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगिषगौडा गौडर यांच्या हत्येप्रकरणी ते मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला , मात्र कारागृहातून कायमची सुटका झालेली नाही.
तरीही त्यांचे शेकडो चाहते, काँग्रेस कार्यकर्ते, यांनी कुलकर्णी यांचे तुरुंगाबाहेर स्वागत केले.हे स्वागत करताना स्वतः विनय कुलकर्णी किंवा त्यांच्या समर्थकांनी तसेच आमदार हेब्बाळकर यांनीही कोविड चे नियम पायदळी तुडवल्याचेच निदर्शनास आले असून याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे.