Thursday, April 25, 2024

/

बेळगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट : तिघे जखमी

 belgaum

गळतीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे नुकसान होण्याबरोबरच तिघे जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी समर्थनगर तिसरा क्रॉस येथे घडली.

उळवेप्‍पा हुलीकट्टी त्याची पत्नी बसवम्मा आणि मुलगा नागराज हुलीकट्टी अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नांवे आहेत. समर्थनगर तिसरा क्रॉस येथील हुलीकट्टी कुटुंबांच्या स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरला लागलेल्या गळतीचे आज शनिवारी सकाळी स्फोटात रूपांतर झाले.

परिसर हादरविणाऱ्या या सिलेंडर स्फोटात घरातील साहित्याचे नुकसान झाले असून स्टील कपाट, पलंग आणि इतर वस्तू जळाल्या आहेत. घराच्या छतावरील पत्रे स्फोटामुळे उडाले आहेत. सदर दुर्घटनेत जखमी झालेल्या तिघाही जणांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.