Sunday, November 24, 2024

/

हयगय केली तर गय करणार नाही!

 belgaum

गुन्हेगारी यादीत असलेल्या व्यक्तींकडून कोणतीही हयगय झाली तर गय करणार नाही. असा इशारा बेळगाव पोलिसांनी दिला आहे.
येत्या ३ सप्टेंबरला होणारी बेळगाव पालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी बेळगाव पोलिसांनी
खबरदारी घेतली आहे.

टिळकवाडी पोलिसांनी रविवारी रौडी परेड घेऊन, निवडणूक काळात कुरबुरी केल्या तर गय करणार नाही असा इशारा दिला आहे.खडेबाजार उपविभागाचे एसीपी चंद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी टिळकवाडी पोलीस ठाण्यात रौडी परेड घेण्यात आली.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी यादीतीतील गुन्हेगारांना बोलावून मनपा निवडणूक व गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थाना बाधा पोहोचेल असे वर्तन न करण्याची सूचना देण्यात आली.

मतदान शांततेत पार पडण्यास सहकार्य करा, काही कुरबुरी केल्यास मुळीच गय केली जाणार नाही असा इशारा एसीपी चंद्रप्पा यांनी यावेळी दिला. यावेळी टिळकवाडी आणि अन्य पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.