बेळगाव आणि बेळगावकर काही कमी नाहीत हे नेहमीच सिद्ध झालेले आहे. अनेकांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने ते सिद्ध केले आहे. भारताचे एअरक्राफ्ट कॅरियर लढाऊ विमान आय एन एस विक्रांत मध्ये एक जर्मन बेस अद्ययावत व्यवस्था बसविण्याच्या कामात बेळगावच्या तरुणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हे योगदान बेळगावकरांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरणार आहे. हम भी है जोश मे असेच या तरुण अभियंत्यांनी दाखवून दिले आहे.
आयएनएस विक्रांत ही लढाऊ नौका आहे. भारताच्या हवाई लढाईत या नौकेचे योगदान महत्वाचे आहे. लढाऊ विमानांना घेऊन जाण्याची आणि युद्ध करण्याची क्षमता या नौकेत असून भारतीय नौदलाची ही नौका शान आहे.
या नौकेत बसविण्यात आलेली रिमोट कंट्रोल सिस्टीम जर्मनीची आहे.ती सिस्टीम दाखल झाल्यानंतर पूर्णपणे ती सिस्टीम इंस्टॉल करून ट्रायल घेण्यासाठी बेळगावच्या कंपनीची निवड करण्यात आली. सर्व सिस्टीम वापरायची कशी याचे प्रशिक्षणही नेव्हीला द्यायचे होते.
हे इंस्टॉलिंग आणि ट्रेनिंग बेळगावच्या त्या कंपनीने अर्थात बेळगाव परिसरातील तरुण अभियंत्यांनी पूर्ण केले आहे. ही कंपनी बेळगाव जवळच्याच वाघवडे येथे आहे. नव्या तंत्रज्ञानाचे ट्रायल 4 ऑगस्टला सुरू झाले आणि कालपर्यंत सुरू होते. विशेषतः
समुद्रात कोचीन येथील नौदलाच्या केंद्रात हे सर्व काम झाले आहे.
बेळगावच्या वाघवडे (मच्छे) येथील विराज टेक्नोक्रॅट्स VIRAAJ TECHNOCRATS नावाच्या फर्मने हे काम करून बेळगावचा अभिमान वाढवला आहे.कंपनीचे मालक रुपेश गोडसे (बीई मेक) रा. नानावाडी आणि सोबत त्यांची टीम किशोर बस्तवाडकर (बीई मेक) – रा.सुळगे येळ्ळूर , श्री निरंजन अणवेकर रा. विष्णू गल्ली वडगांव (बीई E&C) श्री राहुल बस्तवाडकर (बीई मेक) रा. सुळगे येळ्ळूर यांनी हा इतिहास रचला आहे.कोचीन शिपयार्ड लि.द्वारे स्वदेशी विमानवाहू जहाज त्यांनी कमिशन केले आहे.
रिमोट कंट्रोल व्हॉल्व्ह सिस्टम सँडर मरीन, जर्मनी द्वारे पुरविण्यात आली होती. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
कंपनीचे मालक रुपेश गोडसे यांनी याबद्दल बेळगाव live ला माहिती दिली. आम्हाला जे काम मिळाले ते आव्हानात्मक होते. आमच्या साथीदारांची मदत आणि परिश्रम कामाला आले आहेत. असे ते म्हणाले.
A firm from Belgaum named VIRAAJ TECHNOCRATS situated at Waghawade-Machhe
owned by Mr. Rupesh Godse (BE Mech) Nanawadi along with his team Mr. Kishor
Bastwadkar (BE Mech) – Yellur sulga, Mr Niranjan Anvekar (BE E&C)-Vadgaon, Mr Rahul
Bastwadkar (BE Mech) – Yellur sulga has been a part of the history making India’s first
indigenous aircraft carrier by Cochin Shipyard Ltd. They successfully commissioned the
remote controlled Valve system supplied by Sander Marine,Germany. Congratulations, Jai Hind